या प्राणप्रतिष्ठेचे ‘पुण्याहवाचन’चे पौरोहित्य श्री.प.मु.पेडगांवकर यांच्याकडे देण्यात आले. इतर सहकारी ऋत्विजांचे (संचालकांचे) पाठबळ आणि स्वतः श्री. पेडगांवकर सरांची शिस्तबद्धता आणि निरलस वृत्ती यामुळे या 2 वाचनालयरूपी यज्ञाची यथोचित वाटचाल प्रगतीपथावर व विकासाकडे चालु आहे, नव्हे हे वाचनालय पूर्ण विकसितच झाले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. याचाच परिणाम म्हणुन १९८४ साली वाचनालयास जिल्हा ग्रंथालय ‘अ’ वर्ग हा दर्जा मिळाला. सहाय्यक ग्रंथालय संचालक, औरंगाबाद व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य यात लाभले. या घटने नंतर ग्रंथालयाने मागे वळून पाहिले नाही. सतत विकासाचे नवे नवे टप्पे गाठीतच राहीला आहे. पुस्तकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत होती. जुनी इमारत अपुरी पडत होती. ग्रंथालयाचा स्वतःचा ९३६० चौ. फुटाचा प्लॉट उपलब्ध होता. संचालक मंडळ निधीसाठी प्रयन्त करू लागले आणि सन २००० मध्ये या प्रयत्नांना यश आले.

माननीय आमदार श्री. दिवाकर रावते यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधुन ग्रंथालयास इमारतीसाठी रू. ५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये १४०० चौ. फुट जागेवर इमारत उभी राहिली. सन २००१ मध्ये वाचनालय नव्या वास्तुत प्रवेश केला व नव्या वाटचालीस सुरूवात केली. यानंतर चार वर्षानी एक वाचनप्रेमी, डॉ. श्रीराम मसलेकर यांनी वाचनालयास मदत केली. पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी या वाचकाने मोठी मदत केली. याच दरम्यान ग्रंथालयास १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाकडून रू.५ लक्षचे अनुदान मिळाले. त्यामुळे वाचनालयाच्या संगणकीकरणास सुरूवात तर झालीच तसेच पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे गेले. ग्रंथसंख्या, वाचकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, सुसज्ज सभागृह उपलब्ध झाले आणि विविध क्षेत्रात काम करणाया संस्था जनशक्ती वाचक चळवळ, अभिव्यक्ती परिवार, सावरकर अभ्यास मंडळ, इतर संस्थांच्या सहकार्याने विविध विषयावरील कार्यक्रम सतत घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या हे वाचनालय परभणी शहराच्या सांस्कृतिक तसेच साहित्य क्षेत्राचे केंद्ग बनले आहे. वाचनालयाच्या वतीने दर महिन्यास होणारा एक पुस्तक एक दिवस हा उपक्रम मराठवाडयात खुपच गाजला. आत्तापर्यंन्त बयाच पुस्तकावर समिक्षणात्मक चर्चा संपन्न झाली आहे, तर विविध लेखकांच्या प्रकाशन समारंभ वाचनालयाच्या वतीने संपन्न झाले आहेत.सन २००१ पासुन जनशक्ती वाचक चळवळ व वाचनालय बी. रघुनाथ महोत्सवाचे आयोजन सातत्या करते आहे. जो चार दिवस चार विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.

आज वाचनालयाची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची विविध विषयाची जवळ जवळ ८२४८४ ग्रंथसंख्या आहे. वाचनालयात ३५० हस्तलिखीते व दुर्मिळ ग्रंथाची संख्या ४०५ आहे, वाचनालयात एकुण २१६ नियतकालिके येतात, वाचनालयाची सभासद संख्या ही १९६० च्या जवळ आहे व बालवाचक २७६ आहेत तर वाचनालयाने सुरू केलेल्या अभ्यासिकेचा लाभ ४०० ते ५०० विद्यार्थी घेत आहेत.

वाचनालयास राजाराममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कडुन दरवर्षी किमान सातशे ते आठशे हिंदी व इंग्रजीचे पुस्तके येतात व स्वतः वाचनालयाची दरवर्षी बाराशे ते दिडहजार ग्रंथ खरेदी होते तसेच वाचन प्रेमीं कडुन सुध्दा ग्रंथ देणगी मिळत असते. ग्रंथ येण्याचा ओघ प्रचंड आहे त्यामुळे जागेची व साधन सामुग्रीची कमतरता पडते आहे, उपलब्ध रिकामी जागा भरपूर आहे पण निधीची कमतरता आहे व त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नातून अणखी यश मिळाले आहे वाचनालयाचे संचालक श्री.उमरीकर व एक वाचक श्री.लाहोटी यांच्या प्रयत्नाने खासदार श्री.शरद जोशी यांनी वाचनलयास रू.दहा लक्ष निधी उपलब्ध करून् दिला आहे यात समोरील मैदानावर जवळ जवळ सोळाशे ते दोन हजार चौ.फूटाचे सभागृहाचे काम पुर्णत्वास गेले आहे. आज याच सभागृहाच्या वर ३५* ७० (२४५०चौ.फुट) एव्हढे सभागृह उभे राहिले आहे,यात मुलांसाठीची अभ्यासिका व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. वाचनालयाने आपली स्वतःची वेबसाईट नर्माण केली आहे . या नावाने ती इंटरनेटवर उपलब्ध आहे.या वेबासाईटचे उदघाटन परभणीचे आमदार श्री.संजय (बंडु)जाधव यांच्या हस्ते झाले,याप्रसंगी त्यांनी ग्रंथालयाला ग्रंथ खरेदी व साधनसामुग्री साठी दोन लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला यामध्ये ग्रंथालयाने एक लक्ष रूपये किमंतीची केवळ स्पर्धा परिक्षेची पुस्तके खरेदी करून विद्यार्थ्यांसाठी नविन योजना चालु केली आहे. सन २०१२ मध्ये आ.संजय जाधव यांनी वाचनालयास पुन्हा एकदा २ लक्ष रूपायांचा निधी उपलब्ध करून दिला. सुसज्जतेत आणखी भर पडली ती सी.सी.टी .व्ही.कॅमेरांनी,ग्रंथालयाच्या अभ्यासीकेत व इतरत्र वीस कॅमेरे बसवून झाले आहेत व ते आता वाढवायचे आहेत.

 ग्रंथालय विकासाच्या नविन नविन पायऱ्या चढत आहे, याकरिता बऱ्याच जणाचे सहकार्य लाभत आहे. ग्रंथालयाला अशी मदत करणाया ज्ञात अज्ञात व्याक्तीच्या ॠणात संस्था राहु इच्छीते, यासर्व मान्यवरांचे अश्रयदात्यांचे संस्था आभार मानते. वैशिष्ट

 विद्यार्थ्यांसाठी नेट, सेट, स्पर्धा परीक्षा, शालेय स्तरावरील मुलांसाठी एनटीएस, एमटीएस,पीटीएस, नवोदय अशा वेगवेगळ्या परीक्षांची पुस्तके उपलब्ध आहेत व सतत त्यात भर पडते आहे, याबरोबर विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करून त्यांच्यासाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध.

मुलीं साठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष उपलब्ध. परभणीचे सांस्कृतिक केंद्र म्हणुन संस्था काम करू इच्छीते त्यासाठी समोरील सभागृहाच्या वर सुध्दा एक स्वतंत्र सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारावयाचे आहे.

तसेच संस्थेच्या मालकीचे शनिवार बाजार स्थित सुमारे ३५०० चौ.फुट जागा असलेले बी.रघुनाथ सभागृहाचे नूतनीकरण लवकरच अपेक्षित आहे, जे संस्थेचे उत्पन्नाचे मोठे स्त्रोत असेल, यामध्ये खालच्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स व वरच्या मजल्यावर सर्वसोयीयुक्त सभागृह असेल. लवकरच परभणीकंराच्या सवेत रुजू होईल. अशा विविध योजना आहेत. त्याकरीता वाचनालयाला निधीची गरज आहे. वाचन संस्कृती जोपासणाया व ती वाढावी अशी इच्छा असणाऱ्या दात्यांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी वाचनालयास धन, ग्रंथ किंवा साधनसामग्रीच्या स्वरूपात मदत करावी.

शब्दाकंन

संदिप प.पेडगावकर

ganeshwachanalaya@gmail.com

९४२२८७६०९९