दिसामाजी काहितरी ते वाचावे असे संतांनी म्हणले आहे. संतोक्ती प्रमाणे युवा पिढीला उद्युक्त करणे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी मराठवाड्यातील पहीले वाचनालय 'गणेश वाचनालय' हे व्यासपीठ उपलब्ध आहे. वाचनाची आवड निर्माण करणे आणि ती जोपासली जाणे, विविध प्रकारचे जुन्या -नविन साहित्य कृतींची ओळख होणे,वैचारिक देवाणघेवाण वाढवण्यात मदत,शब्द संकलन होणे यासारख्या संधी गणेश वाचनालयाद्वारे पूर्ण होतात. विशेषकरून युवा पिढीवर वाचन संस्कार रुजवण्यात वाचनालयचा वाटा आहे.
इ.स. १९०१ या वर्षी 'गणेश वाचनालय ' असे नामकरण करण्यात आलेल्या या व्यासपीठाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडय़ात परभणी येथे झाली. उद्देश हाच की, मराठीतील अजरामर साहीत्य सर्वांसाठी खुले व्हावे. ज्ञानवृद्धी, मनोरंजन, आवड अथवा छंद , अगदी विरंगुळा म्हणून देखील असंख्य वाचक वर्गाला या व्यासपीठाद्वारे आजतागायत निर्भेळ आनंद मिळत आहे आणि पुढेही मिळणारच.