दर वर्षीच्या या उपक्रमात यंदा संगीता बर्वे यांचेमाझी कविता आणि समाजभान या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्याना पूर्वी डॉ.मधुकरराव चौधरी, अँड. अनंतराव उमरीकर, पद्माकरराव पेडगावकर, डॉ.दिवाण,डॉ.मुळे, डॉ.कातनेश्वरकर  यांच्या उपस्थितीत प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ कै.डॉ.मंजिरी चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम  गणेश वाचनालय व डॉ. चौधरी मित्र मंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.