वाचाल तर वाचाल ! भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती गणेश वाचनालय,परभणी येथे विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. वाचनालयात यानिमीत्ताने ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले, वक्तृत्वस्पर्धा घेण्यात आली, तसेच उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात आला, या निमित्ताने बाल वाचकांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सारखे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लहान मुलावर आधारित  चित्रपट “ I Am Kalam ” दाखविण्यात आला. सुरवातीला सकाळच्या सत्राची सुरवात ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनाने झाली याप्रसंगी वाचनालायाचे वाचक श्री.महादेव स्वामी, श्री.दिलीप चव्हाण तसेच श्री.रमाकांत लिंबेकर, सौ.शोभा कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन केले. या ग्रंथप्रदर्शनात वाचनालयातील चरित्र विभागातील महापुरुषांचे दोनशे चरित्र व वाचनालयाची नवीन खरेदीतील ग्रंथ असे एकूण पाचशे ग्रंथ ठेवण्यात आले होते.

        दुसऱ्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, यात पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यात तीन पारितोषिक देण्यात आली प्रथम रुपये ५००/-व्दितीय ३०१/- तृतीय २०१/- अशी पारितोषीक देण्यात आले.दरवर्षी वाचनालया तर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट वाचक पुरुस्कार जेष्ठ वाचक निवृत्त तहसीलदार श्री. मधुकर (म.शं.) कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी, श्री रमाकांत लिंबेकर वाचनालयाचे सचिव श्री पद्माकर पेडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना म.शं.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व व वाचनाचा उपयोग महसूल सारख्या विभागात कसा झाला हे सांगितले तर श्री.रमाकांत लिंबेकर यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार व त्यांचा दृष्टीकोन तसेच २१व्या शतकातील आधुनिक भारताचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचे प्रतिपादन श्री. रमाकांत लिंबेकर यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन मोटे यांनी केले.