परभणीचे साहित्य विश्व ज्यांच्या नावाने किंबहुना परभणीची च ओळख ज्यांच्या नांवाने आहे. कवि, कथाकार,  कांदबरीकार, बी. रघुनाथ यांच्या स्मृतीत गत वर्षा पासून चार दिवसीय महोत्सव घेतल्या जातो, यामध्ये व्याख्यान, कधी पुस्तकावर चर्चा तर कधी पुस्तक प्रकाशन , संगीत मैफल, कवीसंमेलन असे चार दिवस चार उपक्रम घेतल्या जातात,  याकाळात परभणीकराना सांस्कृतिक मेजवानी असते.