वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमानी वाचनालयात झाला साजरा. भारतरत्न माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याचा उद्देशाने १५ ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. यावेळेही गणेश वाचनालयात विविध उपक्रम घेऊन हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. यामध्ये सुरवातीला ‘वाचन संस्कृती वृध्दींगत’ जोपासण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर या विषयावर श्री रमाकांत लिंबेकर यांनी आपले विचार मांडले यावेळी श्रीकृष्ण इनामदार यांनी त्यांच्याशी वाचन प्रेरणा व वाचन संस्कृती जोपासण्यासाठीचे उपाय यावर संवाद साधला. दुसरा कार्यक्रम एक पुस्तक एक दिवस अंतर्गत पुस्तक परीचायांचा घेण्यात आला यात शिक्षण अधिकारी सुचिता पाटेकर यांनी संपादित केलेल्या ‘गोदाकाठच्या कविता’ या पुस्तकाचा परिचय श्री दिलीप चारठणकर व श्री. संतोष सेलुकर यांनी करून दिला.तिसरा कार्यक्रम सृजन उर्मी साहित्य मंडळाचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी अध्यक्ष म्हणुन मोहन कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली होती, तर काविसंमेलानांचे निवेदन महेश देशमुख यांनी केले.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्त्याने चौथा कार्यक्रम कथा कथनाचा घेण्यात आला यामध्ये परभणीच्या जेष्ठ साहित्यिका सौ. सरोजताई देशपांडे व सौ.अर्चना डावरे यांनी आपल्या कथा सादर केल्या. याच उपक्रमात पाचवा कार्यक्रम ‘अनुवाद कसा करावा व व्यवसायिक लेखन’ या विषयांवर श्री.गो.द.पहिणकर सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी अनुवाद करण्याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले व लेखकांनी व्यावसायिक लेखनाकडे वळावे ते कशा पद्धतीने करावे यासाठीच्या टिप्स दिल्या. अतिशय उपयुक्त असे व्याख्यान सरांनी श्रोत्यांन समोर ठेवले. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित डॉ. विवेक बिंद्रा यांची ए.पी.जे.अब्दुल कलाम वरील ध्वनीचीत्रफित दाखविण्यात आली. अतिशय उत्सहाने वाचन प्रेरणा दिन गणेश वाचनालयात साजरा करण्यात आला.