गणेश वाचनालयात दि.११ जुलै २०२१ रोजी कवी कालिदास दिनानिमित्त कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन श्री प्रमोदशास्त्री कुलकर्णी व श्री रमाकांत लिंबेकर याची प्रमुख उपस्थिती लाभली होती.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते कवी कालीदासांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत श्री.दिवाकर कुलकर्णी यांनी ग्रंथभेट देवुन केले.सुरुवातीला बोलतांना श्री.रमाकांत लिंबेकर यांनी कालिदास दिन का...? व कालिदासांचे साहित्याबद्दल माहिती दिली,तसेच कालीदासाबद्दलच्या कथा ज्या संस्कृत मध्ये उपलब्ध आहेत त्या मराठीत अनुवादित करून सांगितल्या. याप्रसंगी बोलताना कालिदास हे कवींचे कुलगुरू आहेत, त्यांच्या बद्दल सांगताना प्रमोदशास्त्री कुलकर्णीनी कालिदासांच्या बऱ्याच संस्कृत श्लोकांचे पठण तर केलेच पण तेच मराठीत सांगुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, कालीदासांना सरस्वतीच रूप आहे,स्वतः सरस्वतीने कालीदासांना 'आशिर्वाद देतांना म्हंटले "त्वं तु मामकी तनू" तु मीचआहेस असा आशिर्वाद दिला’ त्या महान कवीचा दिन मोठ्या प्रमाणात खर तर साजरा व्हावा आजच्या कवींनी तर त्या महान कवी कडुन खुप शिकन्या सारखे आहे असे प्रतिपादन केले.