‘मराठी राजभाषा दिन’ गणेश वाचनालयात “काव्याविष्कार” या कविता सादरीकरणाच्या अभिनव उपक्रमाने उत्साहात साजरा. सौ.अर्चना डावरे,श्री.महेश देशमुख व डॉ.यशवंत पाटील यांच्या संकल्पनेतून गणेश वाचनालयात कुसुमाग्रज जयंती, मराठी राज्यभाषा दिनानिमित्त जुन्या-नव्या कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सुरुवातीला ओवी काजे हिने कवी समीर सामंत यांच्या ‘हीच आमुची प्रार्थना’ या कवितेनी केली कार्तिक विश्वमित्रे, अश्विनी परसोडे, सौ.अर्चना डावरे,श्री.महेश देशमुख व डॉ.यशवंत पाटील, सौ.सुवर्णा मुळूजकर या सर्वांनी संदीप खरे यांची ‘कधितरी वेड्यागत वागावयास हवे ’हि कविता सादर करून कार्यकमात रंगत भरली. महेश देशमुख यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत सखी हि कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. सौ.सुवर्णा मुळूजकर यांनी बा.सी.मर्ढेकरांची ‘कितीतरी दिवसात’ या कवितेच्या सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली. ‘नाच रे मोरा या’ कवितेच्या सनृत्य सादरीकरणाने ओवी काज हिने श्रोत्यांची भरभरून दाद मिळवली. तसेच आपल्या गोड आवाजात ओवी ने रेवरंड टिळक यांची ‘उन पाऊस’हि कविता सादर केली. ‘प्रेम करावे भिल्लासारखं’ मंगेश पाडगावकर या कवितेच्या सादरीकरणाने महेश देशमुख यांनी कार्यक्रमास एका उंचीवर नेले. ‘चंदनाच्या विठोबाच्या माय गावा गेली’ या प्रिया कातकाडे यांनी सादर केलेल्या कवितेने तसेच कार्तिक विश्वामित्रे यांनी सादर केलेल्या ‘इतुके आले जवळ जवळ की ’ वातावरण भाऊक केले. सौ.अर्चना डावरे यांनी शांता शेळके यांनी ‘पैठणी’ व डॉ.यशवंत पाटील यांनी वसंत बापट यांची ‘बाभूळझाड’ अतिशय उत्कृष्ट रित्या सादर केली. मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने . सौ.सुवर्णा मुळूजकर यांनी आपली स्वतः ची ‘मायबोली’ तर श्रीमती करजगीकर यांनी ‘माय’ या कविता सादर केल्या. सर्व संचांच्या तसेच उपस्थित श्रोत्यांच्या सामुहिक ‘पसायदानाने’ कार्य्क्रमची सांगता झाली.कार्यक्रमाचे आयोजन गणेश वाचनालय व अक्षर प्रतिष्ठा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.