नवोदित स्थानिक कलाकारांनी संगीत मैफिलीने श्रोतांना मंत्रमुग्ध केले परभणीतील गणेश वाचनालयाच्या वतीने दीपावली निमित्ताने गुरुवारी सूर निरागस हो या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व कलाकार हे स्थानिक व नवोदित होते एकूण 14 गाणे या मैफिलीत सादर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पंचतुड या नांदीने झाली यावेळी वाचनालयाच्या वतीने सर्व कलाकारांचे रमाकांत लिंबेकर , शैलेश मंडलिक , विनय पराडकर यांनी शाल व पुष्प देऊन स्वागत केले. मैफिलीची सुरुवात वैदही पाठक हिने ''अवघे गरजे पंढरपूर''या गाण्याने केली बकुळ पेडगावकर यांनी "रूनुझुणू रूनुझुनु रे भ्रमरा"या गाण्याने केली मैफिलीत शार्दुल कुलकर्णी ,बकुळ पेडगावकर,वैदेही पाठक,श्रावणी करभाजने, वरद देशपांडे, यश अबोटी , या कलाकारांनी गीत गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली.